मिथुन राशीत जन्मलेली आजची मुले 23 क. 9 मि. पर्यंत राहतील. त्यानंतर कर्क राशीच्या मुलांचा प्रांत सुरू राहील. विचाराचा आणि प्रवाहांचा उपयोग करून मुले यश मिळवतील. त्यात बौद्धिक प्रांत, आधुनिक क्षेत्रांचा समावेश राहील. अधिकार, कला यांचे विभाग त्यात असतील.
मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षरकर्क राशी उ, ह अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
बुधवार, दि. 3 जुलै 2019
भारतीय सौर, 12 आषाढ 1941
मिती आषाढ शुद्ध प्रतिपदा 22 क. 5 मि.
आर्दा नक्षत्र 6 क. 36 मि. मिथुन चंद्र 2 क. 9 मि.
सूर्योदय 06 क. 7 मि., सूर्यास्त 07 क. 19 मि.
दिनविशेष
1838 - प्रार्थना समाजाचे संस्थापक व संवर्धक मामा परमानंद यांचा जन्म.
1886 - आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत गुरुदेव तथा रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांचा जन्म.
1897 - बडोदा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू हंसा जीवराज मेहता यांचा जन्म.
1914 - लेखक दत्तात्रय गणेश गोडसे यांचा जन्म.
1926 - मराठी लेखिका सुनीता देशपांडे यांचा जन्म.
1952 - गायक अमित कुमार यांचा जन्म.
1996 - अभिनेता कुलभूषण पंडित तथा राज कुमार यांचे निधन.