मीन राशीची मुले 23 क. 30 मी. पर्यंतची राहतील. पुढे मेष राशीत मुलांचा प्रवेश होईल. प्रयत्न प्रगतीचा समन्वय साधून यश मिळवणारी कुशलता आजच्या मुलांमध्ये राहील. त्याचे प्रतिसाद विचार, अधिकार प्राप्ती या प्रांतांत प्रत्ययास येतील.
मीन द, य
मेष अ, ल, ई अक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
गुरुवार, दि. 30 मे 2019
भारतीय सौर, 9 ज्येष्ठ 1941
मिती वैशाख वद्य एकादशी 16 क. 38 मी.
रेवती नक्षत्र 23 क. 3 मि. मीन चंद्र 23 क. 3 मि.
सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 10 मि.
अपरा एकादशी
दिनविशेष
1894 - गोव्यातील प्रसिद्ध इतिहासकार, संशोधक पांडुरुंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म.
1916 - चित्रकार राजकीय व्यंगचित्रकार दीनानाथ दामोदर दलाल यांचा गोवा येथे जन्म.
1950 - प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कृतीचे व्यासंगी संशोधक व पुरातत्वज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचे निधन.
1955 - भारतीय संघटीत कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचे निधन.
1991 - इंदिरा काँग्रेसचे नेते उमाशंकर दीक्षित यांचे निधन.
2012 - प्रसिद्ध बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हा पाचव्यांदा विजय प्राप्त करून विश्वविजेता ठरला.