14 क. 0 मि. पर्यंत वृषभ राशीची मुलं असतील त्यानंतर मिथुन राशीत मुलांचा प्रवेश होईल. बुध-हर्षल शुभयोगामुळे बौद्धिक प्रभाव असतो आणि व्यवहारावर नियंत्रण ठेवता येतं. त्यातूनच स्वत: चे व्यक्तिमत्व आकर्षक करता येईल.
वृषभ राशी ब, व, ऊ अद्याक्षर
मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020
भारतीय सौर 16 माघ 1941
मिती माघ शुद्ध एकादशी 21 क. 31 मि.
मृग नक्षत्र, 25 क. 59 मि., वृषभ चंद्र
सूर्योदय 07 क. 14 मि., सूर्यास्त 06 क. 31 मि.
जया एकादशी
दिनविशेष
1914 - संशोधक, संतवाड्मयाचे अभ्यासक शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे यांचा जन्म.
1919 - स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वहिनी येसूबाई सावरकर यांचे निधन.
1920 - संतवाड्मयाचे अभ्यासक विष्णुबुवा जोग यांचे निधन.
1933 - लेखिका गिरिजा कीर यांचा जन्म.
1936 - कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचा जन्म.
1976 - अभिनेता अभिषेक बच्चन यांचा जन्म.
2000 - आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष वैद्य माधवशास्त्री जोशी यांचे निधन.
2003 - गांधीवादी विचारवंत गणेश गद्रे यांचे निधन.