28 क. 55 मि. पर्यंत मिथुन राशीत जन्मलेल्या मुलांचा प्रांत असेल. त्यानंतर कर्क राशीचा प्रवाह सुरू होईल. बौद्धिक प्रगल्भता आणि सात्विकता अशा समीकरणातून शिक्षण ते उद्योग यामधील प्रवास सुरू राहील. प्रयत्नांनी परमेश्वर हा महामंत्र उपयुक्त ठरेल.
मिथुन राशी क, छ, घ
कर्क राशी ड, ह अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
गुरुवार, 5 मार्च 2020
भारतीय सौर 15 फाल्गुन 1941
मिती फाल्गुन शुद्ध दशमी 13 क. 19 मि.
आर्द्रा नक्षत्र, 11 क. 26 मि., मिथुन चंद्र 28 क. 55 मि.
सूर्योदय 06 क. 55 मि., सूर्यास्त 06 क. 45 मि.
दिनविशेष
1910 - अर्थशास्त्रविषयक नियतकालिकांचे संपादक श्रीपाद वामन काळे यांचा जन्म.
1913 - प्रख्यात शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगल यांचा जन्म.
1914 - नाटककार, समीक्षक शांताराम अनंत देसाई यांचे निधन.
1916 - ओडिशाचे माजी मुख्यमंत्री व स्वातंत्र्यसेनाने बिजू पटनायक यांचा जन्म.
1968 - लेखक, समीक्षक, भाषातज्ञ नारायण गोविंद चाफेकर यांचे निधन.
1974 - दूरदर्शन अभिनेता हितेन तेजवानी याचा जन्म.
1985 - कोशकार देवीदास दत्तात्रेय वाडेकर यांचे निधन.