14 क. 51 मी. पर्यंत मिथुन राशीतील मुले असतील. त्यानंतर मुलं कर्क राशीत प्रवेश करतील. प्रगल्भ विचार आणि प्रवाहाशी समरस होणारी प्रवृत्ती यातून मुलांचा प्रवास सफल होत राहील. समस्या संयमाने सोडवता येतील. पदवी मिळेल. प्राप्ती आकर्षक करता येईल.
जन्माक्षर मिथुन क, छ, घकर्क ड, ह
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
गुरुवार, दि. 6 जून 2019
भारतीय सौर, 16 ज्येष्ठ 1941
मिती ज्येष्ठ शुद्ध तृतीया 9 क. 55 मि.
पूनर्वसू नक्षत्र 20 क. 28 मि. मिथुन चंद्र 11 क. 51 मि.
सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 13 मि.
विनायकी चतुर्थी
दिनविशेष
1909 - मराठी विश्वकोशकार गणेश रंगो भिडे यांचा अष्टे (जि. सांगली) येथे जन्म.
1914 - ललित लेखक, लघुनिबंधकार प्रा. महादेव नामदेव अदवंत यांचा जन्म.
1935 - अध्यात्मिक गुरु तिबेटी नेते दलाई लामा यांचा जन्म.
1939 - भारतीय धावपटू गुर्बाचनसिंग रंधवा यांचा जन्म.
1957 - विद्याविभूषित तत्त्वज्ञ व आधुनिक संत गुरुदेव तथा रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांचे निधन.
2002 - ज्येष्ठ कवयित्री शांता ज. शेळके यांचे निधन. 1996 मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.