कर्क राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना प्रतीक्षा आणि प्रयत्न यांचा समन्वय साधताच कार्यभाग साधावा लागणार आहे. त्यामध्ये पदवी, अधिकार, उद्योग यांचा समावेश राहील. अवास्तव कल्पना मात्र दूर ठेवाव्यात.
कर्क राशी ड, ह अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शुक्रवार, 6 मार्च 2020
भारतीय सौर 16 फाल्गुन 1941
मिती फाल्गुन शुद्ध एकादशी 11 क. 48 मि.
पुनर्वसू नक्षत्र, 10 क. 38 मि., कर्क चंद्र
सूर्योदय 06 क. 55 मि., सूर्यास्त 06 क. 45 मि.
अभलकी एकादशी
दिनविशेष
1899 - चरित्रकार व संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म.
1957 - क्रिकेटपटू अशोक पटेल याचा जन्म.
1965 - प्रसिद्ध शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा जन्म.
1973 - नोबेल पारितोषिक प्राप्त लेखिका पर्ल एस. बक यांचे निधन.
1982 - आदर्श लोकप्रतिनिधी खासदार रामभाऊ म्हाळगी यांचे निधन.
1992 - मराठी लेखक रणजित देसाई यांचे निधन.
1996 - अभिनेता मकरंद देशपांडे यांचा जन्म.
2005 - देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर येथे कार्यान्वित.