वृषभ राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना रवि-नेपच्यून शुभयोगाचे मिळणारे सहकार्य प्रगतीचे चित्र आकर्षक करण्यास उपयुक्त ठरेल. त्यात बौद्धिक प्रांत असतील, उद्योग क्षेत्र राहतील. विज्ञान त्यात प्रवेश करू शकेल.
वृषभ राशी ब, व, ऊ अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
मंगळवार, 7 जानेवारी 2020
भारतीय सौर 17 पौष 1941
मिती पौष शुद्ध द्वादशी 28 क. 15 मि.
कृतिका नक्षत्र, 14 क. 15 मि., वृषभ चंद्र
सूर्योदय 07 क. 15 मि., सूर्यास्त 06 क. 15 मि.
गुरू पूर्व दर्शन
दिनविशेष
1610 - गॅलिलियोने दूरदर्शीच्या साहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.
1893 - स्वातंत्र्यसेनानी जानकीदेवी बजाज यांचा जन्म.
1920 - लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म.
1921 - मराठी अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म.
1961 - अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचा जन्म.
1968 - अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या काठी उतरले.
1979 - अभिनेत्री बिपाशा बासू हिचा जन्म.