मिथुन राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-हर्षल शुभयोगामुळे अनन्यसाधारण गुणांची असतील. त्यात बौद्धिक विभाग महत्त्वाचा ठरेल. विद्या, अधिकार, व्यवहार यात अनपेक्षित संधीतून प्रभाव निर्माण होत राहील. मिथुन राशी क, छ, घ आद्याक्षर- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांगगुरुवार, 9 जानेवारी 2020 भारतीय सौर 19 पौष 1941मिती पौष शुद्ध चतुर्दशी 26 क. 35 मि.मृग नक्षत्र, 15 क. 38 मि., मिथुन चंद्र सूर्योदय 07 क. 15 मि., सूर्यास्त 06 क. 16 मि.
दिनविशेष 1922- जन्मानं भारतीय असलेल्या अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हरगोविंद खुराणा यांचा जन्म1926- अभिनेता कल्याणकुमार गांगुली तथा अनुपकुमार यांचा जन्म1934- प्रसिद्ध गायक महेंद्र कपूर यांचा जन्म1947- राजस्थान विद्यापीठाची जयपूर येथे स्थापना1951- प्रख्यात गायक, लेखक पंडित सत्यशील देशपांडे यांचा जन्म1965- हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फराह खान यांचा जन्म