आज जन्मलेली मुलं - 15 क. 54 मि. पर्यंत जन्मलेली मुलं मेष राशीत असतील. त्यानंतर मुलं वृषभ राशीच्या सहवासात राहतील. निष्ठा आणि आधुनिकता अशा ध्येय मार्गाने आपले उपक्रम सुरू ठेवतील, सफलता संपादन करतील. माता-पित्यास शुभ. मेष राशी - अ,ल,ई, वृषभ राशी - आद्याक्षर ब, व, ऊ (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग सोमवार, दि. 8 एप्रिल 2019भारतीय सौर 18 चैत्र 1941भरणी नक्षत्र 09 क. 43. मि. मेष चंद्र 15 क. 54 मि.सूर्योदय 06 क. 29 मि., सूर्यास्त 06 क. 53 मि. गौरी तृतीया
दिनविशेष 1857 - क्रांतिकारक मंगल पांडे यास फाशी1894 - लेखक बंकिमचंद्र चटर्जी यांचे निधन1924 - शास्त्रीय गायक कुमार गंधर्व यांचा जन्म1928 - मराठी लेखक नाटककार रणजीत रामचंद्र देसाई यांचा जन्म1934 - धर्मनिर्णय मंडळाची स्थापना. धार्मिक नित्यकर्म हे पुस्तक आणि नवे पंचांग मंडळातर्फे दरवर्षी प्रकाशित होत असते. 1953 - वालचंद उद्योगसमूहाचे प्रवर्तक, कर्तबगार उद्योगपती वालचंद हिराचंद यांचे निधन.