आज जन्मलेली मुलं - 22 क. 32 मि. पर्यंतची मुलं वृषभ राशीत असतील. त्यानंतर, मुलं मिथून राशीत प्रवेश करतील. अभिनव उपक्रम, तर्कशुद्ध व्यवहार यामधून आजचा प्रवास यशस्वी करतील. संगीत विभाग, बौद्धिक कार्य यामध्ये संपर्क शक्य आहे. वृभष राशी - ब, व, ऊ, मिथुन राशी - क, छ, घ, आद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग बुधवार, दि. 10 एप्रिल 2019भारतीय सौर 20 चैत्र 1941मिती चैत्र शुद्ध पंचमी 15 क. 36 मि.रोहिणी नक्षत्र 10 क. 33 मि., वृषभ चंद्र 22 क. 32 मि.सूर्योदय 06 क. 27 मि., सूर्यास्त 06 क. 53 मि.
दिनविशेष 1901 - प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ धनंजयराव रामचंद्र गाडगीळ यांचा जन्म1907 - नाटककरा, दिग्दर्शक मोतीराम गजानन तथा मो.ग. रांगणेकर यांचा जन्म1932 - प्रख्यात शास्त्रीय गायिका किशोरी अमोणकर यांचा जन्म1932 - सहकार व प्रशिक्षण क्षेत्रातील बाळासाहेब विखे पाटील यांचा जन्म1937 - महाराष्ट्र ज्ञानकोशाचे निर्माते, ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे निधन1965 - शिक्षणमहर्षी व माजी कृषिमंत्री पंजाबराव शामराव देशमुख यांचे निधन1995 - माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे निधन.