आज जन्मलेली मुलं
9 क. 15 मि. पर्यत मिथुन राशीची मुले जन्म घेतील. त्यानंतर मुले कर्क राशीत प्रवेश करतील. प्रयत्न आणि सफलता यांची समन्वयासाठी शिकस्त करावी लागेल. त्यात संयम अधिक आवश्यक राहील. सामाजिक, सांस्कृतिक कार्याशी संबंध यावा. मिथुन राशी 'क', 'छ', 'घ' आद्याक्षर. कर्क राशी 'ड', 'ह' आद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचाग
मंगळवार, दि. 31 जुलै 2019
- भारतीय सौर 9 श्रावण 1941
- मिती आषाढ वद्य त्रयोदशी 11 क. 58 मि.
- पुनर्वसू नक्षत्र 14 क. 1 मि., मिथुन चंद्र 9 क. 15 मि.
- सूर्योदय 06 क. 16 मि., सूर्यास्त 07 क. 04 मि.
- दर्श अमावस्या, दिपपूजन
दिनविशेष
1865- महाराष्ट्रातील थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक जगन्नाथ शंकरशेठ मरकुटे यांचे निधन.
1872- प्राचीन वाड्मयाचे इतिहासकार, मराठी संतचरित्रकार लक्ष्मण रामचंद्र तथा ल.रा. पांगारकर यांचा जन्म.
1947- हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज यांचा जन्म.
1965- 'हॅरिपॅाटर' या प्रसिद्ध व्यक्तिचित्राच्या लेखिका जॅानी रोलिंग यांचा जन्म.
1968- शतयुषी विद्वान पंडित, चित्रकार, वेदमूर्ती श्रीपाद यांचा जन्म.
1980- प्रख्यात पार्श्वगायक महंमद रफी यांचे निधन.
शुभाशुभ चौघडी
दिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी सहा प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराच्या सूर्योदय- सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासू पुढे करावा.
दिवसा - सकाळी 6 ते 7.30 लाभ, 7.30 ते 9 अमृत, 9 ते 10.30 काल, 10.30 ते 12 शुभ, 12 ते 1.30 रोग, 1.30 ते 3 उद्धेग, 3 ते 4.30 चंचल, 4.30 ते 6 लाभ. रात्री - 6 ते 7.30 उद्धेग, 7.30 ते 9 शुभ, 9 ते 10.30 अमृत, 10.30 ते 12 चंचल, 12 ते 1.30 रोग, 1.30 ते 3 काल, 3 ते 4.30 लाभ, 4.30 ते 6 उद्धेग.