आजचे पंचांग
सोमवार दि. 9 डिसेंबर 2019
भारतीय सौर 18, मार्गशीर्ष 1941
मिती मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी 09 क. 54 मि.
भरणी नक्षत्र 29 क. 00 मि. सूर्यास्त 06 क. 00 मि.
सोमप्रदोष
आज जन्मलेली मुलं
आज जन्मलेली मुले मेष राशीची आहेत. चंद्र-शुक्र नवपंचम योगाच्या सहवासात त्यांचे व्यवहार सुरू राहतील. त्यात आकर्षकता निर्माण करतील. प्राप्ती ते प्रतिष्ठा यांचा त्यात समावेश राहील. कलाक्षेत्रात यश मिळवू शकतील. मेष राशी अ, ल, ई अद्याक्षर - अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष
1900 अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद मुंबईत परतले.
1900 डेव्हिस कप टेनिस स्पर्धेची सुरुवात.
1942 द्वारकानाथ कोटणीस यांचे निधन.
1946 काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा जन्म.
1993 चित्रपट अभिनेत्री स्नेहप्रिया प्रधान यांचे निधन.
1997 ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, पद्मभूषण, साहित्य अकादमी अवॉर्ड विजेते के. शिवम कारंथ यांचे निधन.