पंचाग ,शुक्रवार, दि. 10 एप्रिल 2020
- भारतीय सौर २१ चैत्र १९४२- मिती चैत्र वद्य तृतीया २१ क. ३२ मि.- विशाखा नक्षत्र २४ क. १५ मि., तुला चंद्र- सूर्योदय ०६ क. २४ मि., सूर्यास्त ०६ क. ५६ मि.- ग्रुडफ्रायडे
आज जन्मलेली मुलं
१६ क. २६ मि. पर्यत तुला राशीत चंद्र असेलेली मुले जन्म घेतील. त्यानंतर वृश्चिक राशीत मुले प्रवेश करतील. अभिनव विचार आणि जिद्द यांच्या सहवासाने मुले कार्यप्रांतातील प्रवासात सफल होईल, संस्काराचा त्यात अधिकाधिक उपयोग होईल. तुला राशी र, त, वृश्चिक राशी न, स अद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष
१८९४- बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म.
१९०१- प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ यांच्या जन्म.
१९०७- नाटककार, दिग्दर्शक मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर यांचा जन्म.
१९३२- महाराष्ट्रातील सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील बाळासाहेब विखे पाटील यांचा जन्म.
१९३२- शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचा जन्म.
१९६५- महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रेमी व माजी कृषीमंत्री पंजाबराव श्यामराव देशमुख यांचे निधन.
१९९५- भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे निधन.