आज जन्मलेली मुलं
6 क. मि. 55 मि. पर्यत मुले वृषभ राशीत असतील. त्यानंतर मिथुन राशीची मुले राहतील. रवि हर्षल केंद्रयोगामुळे प्रवासात सारखे बदल करावे लागतील. व्हवहारांत सारखी अस्थीरता राहते. विचलीत होऊ नका. संयम आणि शिस्त यांचा अभ्यास करा. वृषभ 'ब' व 'ऊ' मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचाग
सोमवार, दि. 29 जुलै 2019
- भारतीय सौर 7 श्रावण 1941
- मिती आषाढ वद्य द्धादशी 17 क. 9 मि.
- मृग नक्षत्र 18 क. 22 मि. वृषभ चंद्र 6 क. 55 मि.
- सूर्योदय 06 क. 16 मि., सूर्यास्त 07 क. 14 मि.
- सोमप्रदोष
दिनविशेष
1891- उदारमतवादी सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे निधन.
1904- भारतरत्न जहांगीर रतनजी दादाभाई टाटा यांचा जन्म.
1922- शिवचरित्राचे गाढे अभ्यासक बळवंतराव मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म.
1925- प्रसिद्ध व्यंगचित्रकार शिवराम दत्तात्रेय फडणीस यांचा जन्म.
1953- प्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांचा जन्म.
1959- प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांचा जन्म.
2002- संगीतकार, गायक आणि गीत रामायणकार सुधीर फडके यांचे मुंबई येथे निधन.
शुभाशुभ चौघडी
दिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी सहा प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराच्या सूर्योदय- सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासू पुढे करावा.
दिवसा - सकाळी 6 ते 7.30 अमृत, 7.30 ते 9 काल, 9 ते 10.30 शुभ, 10.30 ते 12 रोग , 12 ते 1.30 उद्धेग, 1.30 ते 3 चंचल, 3 ते 4.30 लाभ, 4.30 ते 6 अमृत. रात्री - 6 ते 7.30 चंचल, 7.30 ते 9 रोग, 9 ते 10.30 काल, 10.30 ते 12 लाभ, 12 ते 1.30 उद्धेग, 1.30 ते 3 शुभ, 3 ते 4.30 अमृत, 4.30 ते 6 चंचल.