आजचे पंचाग
सोमवार, दि. 23 डिसेंबर 2019
भारतीय सौर 02 पौष 1941
मिती मार्गशीष वद्य द्वादशी 13 क. 42 मि.
विशाखा नक्षत्र 17 क. 40 मि., तुला चंद्र 11 क. 53 मि.
सूर्योदय 07 क. 9 मि., सूर्यास्त 06 क. 06 मि.
सोमप्रदोष
आज जन्मलेली मुलं
तुला राशीतील मुले 11 क. 53 मि. पर्यतची राहतील. त्यानंतर वृश्चिक राशीच्या मुलांचा समावेश राहील. विचार आणि परिश्रम यामधून मुले प्रवास सुरु ठेवतील आणि गुरुकृपेने यश संपादन करतील. मातापित्यास शुभ. तुला राशी र, क अद्याक्षर. वृश्चिक राशी र, य अद्याक्षर
दिनविशेष
1902- भारताचे माजी पंतप्रधान चरणसिंह चौधरी यांचा जन्म.
1940- उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिंदुस्थान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरु करुन भारतातील विमान निर्मिती उद्योगाची महूर्तवेढ रोवली.
2004- भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे निधन.
2010- लेखक, समीक्षक ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी यांचे निधन.
2010- केरळचे माजूी मुख्यमुंत्री के. करुणाकरन यांचे निधन.