पंचागसोमवार, दि. 13 जानेवारी 2020- भारतीय सौर 23 पौष 1941- मिती पौष वद्य तृतीया 17 क. 33 मि.- आश्लेषा नक्षत्र 09क. 55 मि., कर्क चंद्र 09 क. 55 मि. - सूर्योदय 07 क. 16 मि., सूर्यास्त 06 क. 19 मि.- संकष्टी चतुर्थी (चंद्रोदय 21 क. 02 मि.)
दिनविशेष
1832 - लॉर्ड्स या जगप्रसिद्ध क्रिकेट मैदानाचे संस्थापक थॉमस लॉर्ड्स यांचे निधन
1926 - प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक शक्ती सामंता यांचा जन्म
1938 - प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म
1949 - पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म
1997 - उद्योजक, वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबुराव पारखे यांचे निधन ट
2011 - ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे निधन
आज जन्मलेली मुलं
कर्क राशीची मुले 09 क. 55 मि पर्यंत राहतील. पुढे सिंह राशीची मुले आहेत. रवि-शनि युतीमुळे मुलांना शिक्षण आणि व्यवहारात फार परिश्रम घेऊन कार्यभाग साधावा लागणार आहे. मंगळ आणि गुरू यांचे त्यात सहकार्य लाभेल. कर्क राशी ड, ह, सिंह राशी म, ट अद्याक्षर - अरविंद पंचाक्षरी