वृश्चिक राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र- मंगळ युतीमुळे तडफदार असतील. प्रयत्नाने यश संपादन करतील. त्यात शिक्षण ते उद्योग असे कार्यप्रांत राहतील. स्थिरतेसाठी संयम आवश्यक राहील. वृश्चिक राशी न, य अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
सोमवार, 20 जानेवारी 2020
भारतीय सौर 30 पौष 1941
मिती पौष वद्य एकादशी 26 क. 06 मि.
अनुराधा नक्षत्र, 23 क. 30 मि., वृश्चिक चंद्र
सूर्योदय 07 क. 16 मि., सूर्यास्त 06 क. 23 मि.
दिनविशेष
1861- मराठीतील पहिल्या स्त्री कथा, कादंबरीकर व समाजसुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म.
1898- गायक, नट मास्टर कृष्णराव (फुलंब्रीकर) यांचा जन्म.
1951- आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट या संस्थेची मुहूर्तमेढ करण्यात आली.
1988- स्वातंत्र्यसेनानी खान अब्दुल गफार खान तथा सरहद्द गांधी यांचे निधन.
1988- उद्योगपती कस्तुरभाई लालाभाई यांचे निधन