सिंह राशीच्या मुलांचा प्रांत 30 क. 22 मि. पर्यंत राहील. त्यापुढे कन्या राशीत मुले जन्म घेतील. प्रभाव आणि विचार यांचा सहवास प्रिय असणारी मुले प्रगतीचे चित्र स्पष्ट करू शकतील. त्यात बौद्धिक प्रगल्भता आणि व्यावहारिक प्रयत्न यांचा समावेश राहील. सिंह राशी म, ट, कन्या राशी प, ठ, न अद्याक्षर. अरविंद पंचाक्षरीआजचे पंचांग सोमवार 9 मार्च 2020भारतीय सौर 19 फाल्गुन 1941मित्ती फाल्गुन शुद्ध पौर्णिमा 23 क. 18 मि.सिंह चंद्र 30 क. 22. मि.सूर्योदय 06 क. 53 मि., सूर्यास्त 06 क. 46 मि. हुताशनी पौर्णिमा- होळी
दिनविशेष1863 मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक, नट लक्ष्मण ऊर्फ भाऊराव बापूजी कोल्हटकर यांचा जन्म1899 महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म1951 प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म1971 हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक के. आसिफ यांचं निधन1994 फाळके पुरस्कारप्राप्त चित्रपट अभिनेत्री देविका राणी यांचे निधन2000 ज्येष्ठ अभिनेत्री उषा किरण यांचं निधन2012 अभिनेता जॉय मुखर्जी यांचे निधन