मिथुन राशीची मुले 11 क. 40 मि.पर्यंतची असतील. यापुढे कर्क राशीच्या मुलांच्या प्रांत सुरू होतो. शुक्र-नेपच्यून नवपंचम योगामुळे विचारात आधुनिकता आणि विज्ञान यांचा समावेश होऊ शकतो. प्रवास होतील.मिथुन राशी - क, छ, घ, तर कर्कराशी- ड, ह अद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019
भारतीय सौर, 29 आश्विन 1941
मिती आश्विन वद्य सप्तमी 06 क. 45 मि.
पुनर्वसू नक्षत्र 17 क. 32 मि. मिथुन चंद्र 11 क. 40 मि.
सूर्योदय 06 क. 36 मि., सूर्यास्त 06 क. 11 मि.
कालाष्टमीदिनविशेष पोलीस स्मृतिदिन(1959 पासून)1789- पेशवेकालीन सुप्रसिद्ध न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांचे निधन1917- मराठी संगीतकार, गायक राम फाटक यांचा जन्म1923- जीवन विद्या मिशनचे संस्थापक सद्गुरू वामनराव पै यांचा जन्म1931- प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते शम्मी कपूर यांचा जन्म1833- स्विडीश शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिकाचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म1998- चित्रपटातून खलनायकांच्या भूमिकांमुळे गाजलेले अभिनेते अजित यांचे निधन2012- हिंदी चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, कथा लेखक यश चोपडा यांचे निधन