आजचे पंचांग
मंगळवार, दि. 8 ऑक्टोबर 2019
भारतीय सौर 16 अश्विन 1941
मिती अश्विन शुद्ध दशमी 14 क. 57 मि.
श्रवण नक्षत्र 20 क. 12 मि. मकर चंद्र.
सूर्योदय 06 क. 32 मि. सूर्यास्त 06 क. 21 मि.
विजयादशमी (दसरा)
दिनविशेष
भारतीय हवाई दल दिन
1891 - उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म
1926 - प्रसिद्ध अभिनेता कुलभूषण पंडित ऊर्फ राजकुमार यांचा जन्म
1935 - द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचा जन्म
1936 - हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचे निधन
1979 - स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वोदयी नेते 'लोकनायक' जयप्रकाश नारायण यांचे निधन
1996 - प्रसिद्ध समाजसेविका आणि लेखिका गोदावरी परुळेकर यांचे निधन
1998 - समाजसेविका, इंदिराबाई हळबे यांचे निधन
2012 - पत्रकार, पार्श्वगायिका वर्षा भोसले यांचे निधन
आज जन्मलेली मुले
आजची मुले मकरराशीत जन्मलेली असतील आणि रवि-चंद्र नवपंचम योगामुळे त्यांना भरीव यश संपादन करता येईल. शिक्षण, उद्योग आणि अधिकार ही त्यांची केंद्र असतील. माता-पित्यास शुभ. मकर राशी. ज.ख. अध्याक्षर- अरविंद पंचाक्षरी