आज जन्मलेली मुलं: 28 क 22 मि पर्यंत मीन राशीत जन्मलेली मुले राहतील. त्यानंतर मेष राशीत मुले प्रवेश करतील. प्रारब्ध आणि प्रयत्न यांच्यावर विश्वास ठेवून मुलांचा प्रवास कार्यपथावरुन सुरु राहील. त्यामध्ये शिक्षण ते धर्म अशी वर्तुळं राहतील. समाज प्रशंसा करील, मीन राशी द, च आद्याक्षर मेष राशी अ, ल, ई आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांगसोमवार, दि. 16 सप्टेंबर 2019 भारतीय सौर 25 भाद्रपद 1941मिती भाद्रपद वद्य द्वितीया 14 क 36 मि.रेवती नक्षत्र 28 क 22 मि. मीन चंद्र 28 क 22 मि.सूर्योदय 06 क 27 मि., सूर्यास्त 06 क 40 मि.
आजचे दिनविशेष 1913 - रुचिरा या पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओगले यांचा जन्म1916 - ख्यातनाम गायिका एम. एस सुब्बलक्ष्मी यांचा जन्म 1942 - आधुनिक मराठी कवी नामदेव धोंडो तथा ना. धों. महानोर यांचा जन्म1945 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा जन्म1950 - छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचा जन्म 1977 - प्रसिद्ध गायिका केसरबाई केरकर यांचे निधन1994 - नाटककार जयवंत दळवी यांचे निधन