आज जन्मलेली मुलं
वृषभ राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र शुक्र शुभायोगामुळे प्रशंसनीय यश मिळतील. अनेक प्रांतात प्रबल होत राहतीलच, परंतु मंगळ शनि योगातील वादग्रस्त समस्यांमध्ये सावध राहावे. त्यातून सफलता सोपी होईल. वृषभ राशी ब व ऊ आद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचाग
शनिवार, दि. 27 जुलै 2019
- भारतीय सौर 5 श्रावण 1941
- मिती आषाढ वद्य दक्षमी 19 क. 46 मि.
- कृतिका नक्षत्र 19 क. 30 मि. वृषभ चंद्र
- सूर्योदय 06 क. 15 मि., सूर्यास्त 07 क. 15 मि.
दिनविशेष
1911 - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॅा. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्म.
1939 - प्रसिद्ध मराठी कथा अरविंद बगे यांचा जन्म
1967 - अभिनेता तथा निर्माता राहुल बोस यांचा जन्म
1975 - मराठी दिग्दर्शक राजा ठाकूर यांचे निधन.
1992 - अभिनेते अमजदखान यांचे निधन.
2002 - भारताचे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन.
2015 - भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे निधन.
शुभाशुभ चौघडी
दिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी सहा प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराच्या सूर्योदय- सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासू पुढे करावा.
दिवसा - सकाळी 6 ते 7.30 काल, 7.30 ते 9 शुभ, 9 ते 10.30 रोग, 10.30 ते 12 उद्धेग , 12 ते 1.30 चंचल, 1.30 ते 3 लाभ, 3 ते 4.30 अमृत, 4.30 ते 6 काल. रात्री - 6 ते 7.30 लाभ, 7.30 ते 9 उद्धेग, 9 ते 10.30 शुभ, 10.30 ते 12 अमृत, 12 ते 1.30 चंचल, 1.30 ते 3 रोग, 3 ते 4.30 काल, 4.30 ते 6 लाभ.