29 क. 26 मि. पर्यंत धनु राशीत मुलं जन्मास येतील. पुढे मकर राशीची मुलं असतील. प्रगल्भ विचार याणि प्रभावी व्यवहार, कुशलता सफर प्रवासासाठी प्रमुख केंद्र राहतील. सांस्कृतिक सामाजिक कार्याशी संबंध येतील. संधीचा उपयोग करावा.
धनु राशी - भ, ध
मकर राशी - ज, ख अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019
भारतीय सौर, 11 कार्तिक 1941
मिती कार्तिक शुद्ध षष्ठी 25 क. 31 मि.
पूर्वाषाढा नक्षत्र 23 क. 01 मि. धनु चंद्र 29 क. 26 मि.
सूर्योदय 06 क. 40 मि., सूर्यास्त 06 क. 04 मि.
भानु सप्तमी
दिनविशेष
1833 - समाजसुधारक, विज्ञानप्रसारक महेंद्रलाल सरकार यांचा जन्म.
1882 - महाराष्ट्रातील पहिली जादुची शाळा सुरू करणारे जादूगार आचार्य डॉ. के. बी. लेले यांचा जन्म.
1885 - बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे गुर्लहोसूर येथे निधन.
1897 - निर्माते, अभिनेते सोहराब मेहेरबानजी मोदी यांचा जन्म.
1960 - संगीतकार, गायक अनू मलिक यांचा जन्म.
1965 - प्रसिद्ध सिनेअभिनेता शाहरूख खान याचा जन्म.
2012 - विख्यात भारतीय गणितज्ञ श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे निधन.