पंचागरविवार, दि. १२ एप्रिल २०२०- भारतीय सौर २३ चैत्र १९४२- मिती चैत्र वद्य पंचमी १७ क. १६ मि.- ज्येष्ठा नक्षत्र,१९ क. १३ मि.- वृश्चिक चंद्र १९ क. १३ मि.- सूर्योदय ०६ क. २५ मि., सूर्यास्त ०६ क. ५४ मि.
दिनविशेष१८७१- संपादक, बाल वाड्मयकार आणि कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म१९१० -प्रतिभा संपन्न लेखक, पुणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे यांचा जन्म१९१७ - भारताचे सलामीचे फलंदाज विनू मांकड यांचा जन्म१९२० - कथालेखिका, कारंबरीकार, बाल साहित्यकार, शैलजा प्रसन्नकुमार राजे यांचा मुंबईत जन्म १९४३ - लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचा जन्म१९५४ - लेखक, दिग्दर्शक, कवी, गीतकार सफदर हश्मी यांचा जम्म१९७७ - प्रसिद्ध शिकार कथा लेखक भानू शिरधनकर यांचे निधन
आज जन्मलेली मुलं...१९ क. १३ मि. पर्यंत वृश्चिक राशीत जन्मलेली मुले असतील. त्यानंतर मुले धनु राशीत प्रवेश करतील. गुरु-मंगळ सहयोगामुळे मुलांच्या प्रवासात सफलता असेल. निर्धार, निष्ठा त्यांचा त्यात सहभाग राहील. वृश्चिक राशी न, य, धनु राशी भ, ध अद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी