आजचे पंचांग
रविवार, दि. 15 डिसेंबर 2019
भारतीय सौर 24, मार्गशीर्ष 1941
मिती मार्गशीर्ष वद्य तृतीया 7 क. 18 मि.
पुष्य नक्षत्र 28 क. 01 मि., कर्क चंद्र
सूर्योदय 07 क. 05 मि. सूर्यास्त 06 क. 02 मि.
संकष्टी चतुर्थी (चंद्रोदय 21 क.09 मि.)
दिनविशेष
आंतरराष्ट्रीय चहा दिन
1832 - आयफेल टॉवरचा निर्माता अलेक्झांद्रे गुस्ताव्ह आयफेलचा जन्म
1905 - सुप्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांचा जन्म
1929 - मराठी रंगभूमीवरील अभिनेता, नाटककार बबन प्रभू यांचा जन्म
1935 - पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांचा जन्म
1950 - भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन
1966 - वॉल्ट डिस्नेचे निधन
1976 - भारतीय फुटबॉलपटू बैचुंग भुतिया याचा जन्म
आज जन्मलेली मुलंकर्क राशीत जन्मलेली आजची मुले गुरु-हर्षल नवपंचम योगामुळे अनेक क्षेत्रात प्रयत्नातून यश संपादणारा चमत्कार निर्माण करतील. त्यात बौद्धिक सामर्थ्य मोठे असेल. व्यवहार आकर्षक करता येतील. कर्क राशी 'ड', 'ह' अद्याक्षर. - अरविंद पंचाक्षरी