आजचे पंचांग रविवारी, 23 फेब्रुवारी 2020भारतीय सौर 04 फाल्गुन 1941मिती माघ वद्य अमावास्या 21 क. 2 मि.धनिष्ठा नक्षत्र, 13 क. 43 मि., कुंभ चंद्र सूर्योदय 07 क. 4 मि., सूर्यास्त 06 क. 41 मि.
दर्श अमावास्या
आज जन्मलेली मुलं
कुंभ राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र-हर्षल शुभयोगामुळे संधीतून सफलता संपादन करत राहतील. परंतु शुक्र-गुरू केंद्र योगामुळे प्रलोभनापासून दूर राहून पदवी, अधिकार, सहकार यांना आकार द्यावा लागेल. कुंभ राशी ग, स अद्याक्षर.
दिनविशेष
1876 - प्रसिद्ध समाजसुधारक देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचा जन्म.
1904 - समाजसुधारक, विज्ञान प्रसारक महेंद्रलाल सरकार यांचे निधन.
1913 - प्रसिद्ध जादुगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार यांचा जन्म.
1954 - पीटर्सबर्ग येथे प्रथमच पोलिओ प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.
1965 - अभिनेता स्टॅन लॉरेलचे निधन (लॉरेल अँड हार्डीमधील रड्या)
1969 - अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन हिचा जन्म
2004 - दिग्दर्शक विजय आनंद यांचे निधन