आजचे पंचाग
रविवार, दि. 5 जानेवारी 2020
भारतीय सौर 15 पौष 1941
मिती पौष शुद्ध दशमी 27 क. 07 मि.
अश्विनी नक्षत्र, 12 क 27 मि. मेष चंद्र
सूर्योदय 07 क. 14 मि., सूर्योस्त 06 क. 14 मि.
आज जन्मलेली मुलं
मेष राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र-गुरू नवपंचम योगाचे सहकार्य घेऊन आपले उपक्रम सुरू ठेवणार असल्याने व कर्तृत्वाच्या नव्या नव्या बाजू प्रकाशमान होत राहतील. त्यात शिक्षणातील पदवी, व्यवहारप्राप्ती यांचा समावेश राहील.मेष राशीअद्याक्षर - अ, ल, ई ॉ
- अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष
1892 - मराठी भाषाशास्त्रज्ञ, लेखक कृ. पा. तथा कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म.
1913 - प्रख्यात साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांचा जन्म.
1948 - अभिनेत्री, गायिका फय्याज यांचा जन्म.
1956 - तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म.
1961 - बाल साहित्यकार ना. धों. ताम्हणकर यांचे निधन.
1982 - ज्येष्ठ संगीतकार रामचंद्र चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र यांचे निधन.
1986 - प्रख्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा जन्म.