आज जन्मलेली मुलं - कुंभ राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना बुध- हर्षल शुभयोगाची मिळाणारी अनुकूलता अनेक क्षेत्रात श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास उपयुक्त ठरणारी आहे. बौध्दिक प्रांत, शोधकार्यापर्यत पोहचू शकेल. उद्योग, अधिकार यात प्रभाव राहील. कुंभ राशी ग, स अद्याक्षर. (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग रविवार दि. 22 मार्च 2020
भारतीय सौर 2 चैत्र 1942मिती फाल्गुन वद्य त्रयोदशी 10 क. 08 मि.शततारका नक्षत्र 22 क. 27 मि., कुंभ चंद्रसूर्योदय 06 क. 42 मि., सूर्यास्त 06 क. 49 मि. शिवरात्र
आजचे दिनविशेष
जागतिक जलदिन
1832- जगप्रसिद्ध जर्मन साहित्यिक योहान वोल्फ- गांग वोन गटे यांचे निधन.
1924- नाटककार, पटकथाकार मधुसूदन रामचंद्र कालेलकर यांचा जन्म.
1949 - माध्यमिक शालांत परीक्षची सुरुवात.
1957- शकावर आधारलेले राष्ट्रीय पंचांग भारताने स्वीकारले.
1979- केरळचे प्रसिद्ध पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक संदीप पम्पली यांचा जन्म.
1984- लेखक प्रभाकर आत्माराम पाध्ये यांचे निधन.
2000- भारताची टेबल टेनिसपटू नैना जायस्वाल हिचा जन्म.
2005- तामिळ अभिनेते जेमिनी गणेशन यांचे निधन.