27 क. 44 मि. पर्यत तुला राशीत जन्मलेली मुलं असतील. त्यानंतर वृश्चिक राशीत मुलं जन्म घेतील. आकर्षक कार्यपद्धती आणि परिश्रमातून सफलता संपादन करणे अशा प्रवाहातून शिक्षण ते व्हवहार यात मुलं चमकतील. तुला राशी र, त, वृश्चिक राशी न, य अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
रविवार 25 नोव्हेंबर 2019
भारतीय सौर 04 मार्गशीर्ष 1941
मिती कार्तिक वद्य चतुर्दशी 22 क. 41 मि.
स्वाती नक्षत्र 10 क. 57 मि., तुला चंद्र 27 क. 44 मि.
सूर्योदय 06 क. 53 मि., सूर्यास्त 05 क. 58 मि.
शिवरात्र
दिनविशेष
1882 - मराठी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा जन्म.
1921 - नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.
1922- प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ पांडुरंग गुणे यांचे निधन.
1962- आधुनिक संतकवी गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे ऊर्फ दासगणू यांचे निधन.
1984- माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे निधन.
1997- लोकमतचे संस्थापक संपादक, माजी मंत्री, स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे निधन.