पंचागगुरुवार, दि. ९ एप्रिल २०२०- भारतीय सौर २० चैत्र १९४२- मिती चैत्र वद्य द्वितीया २४ क. ३९ मि.- स्वाती नक्षज्ञ २४ क. १५ मि., तुला चंद्र- सूर्योदय ०६ क. २७ मि., सूर्यास्त ०६ क. ५६ मि.
दिनविशेष १८२८ - समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म.१८९३ - तत्वचिंतक राहुल सांकृतायन यांचा जन्म.१९४८ - प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांचा जन्म.१९९० - प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांचे निधन.२००१ - ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि दलित साहित्य चळवळीचा आधारस्तंभ, मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू शंकरराव खरात यांचे निधन.२००९ - चित्रपट निर्माता, दिग्दर्शक शक्ती सामंत यांचे निधन.२००९ - मराठी गीतकार अशोक गणेश परांजपे यांचा जन्म.
आज जन्मलेली मुलं...तुला राशीत जन्मलेली आजची मुले आकर्षक व्यक्तीमत्वाची, आधुनिक विचारांची असतील. कला प्रांताशी संपर्क येणे शक्य आहे. कार्यपद्धतीत संयम अधिक सफलता देणार ठरेल. तुला राशी र, त अद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी