आजचे पंचांग
भारतीय सौर 28, मार्गशीर्ष 1941
मिती मार्गशीर्ष वद्य अष्टमी 21 क. 23 मि.
उत्तरा नक्षत्र 22 क. 34 मि., कन्या चंद्र
सूर्योदय 07 क. 07 मि., सूर्यास्त 065 क. 04 मि.
कालाष्टमी
आज जन्मलेली मुलं
कन्या राशीत जन्मलेली आजची मुले मंगळ- शनि शुभायोगाच्या आधाराने प्रयत्न प्रगतीच्या समन्वयातून आपली मोठी कार्यक्षेत्र उभी करतील. बौद्धिक यश, अधिकार, अर्थप्राप्ती यांचा त्यात समावेश होऊ शकेल. माता- पित्यास शुभ. कन्या राशी प, ठ, ण अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष
1901- महात्मा गांधी दक्षिण अफ्रिकेतून भारतात परतले.
1919- चरित्र अभिनेते ओमप्रकाश यांचा जन्म.
1934- भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंह पाटील यांचा जन्म झाला.
1961- गोवा मुक्त झाला.
1969- क्रिकेटपटू नयन मोंगिया याचा जन्म.
1997- स्वातंत्र्यसैनिक, महाराष्ट्र राज्य साहित्या आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॅा. सुरेंद्र बारलिंगे यांचे निधन.
2010- भारतीय उद्योगपती गिरिधारीलाल केडिया यांचे निधन.