पंचाग गुरुवार, दि 27 फेब्रवारी 2020भारतीय सौर 08 फाल्गुन 1941मिती फाल्गुन शुद्ध चतुर्थी 30 क.45मी.रेवती नक्षत्र 25.क.8 मि.मीन चंद्र 25 क. 8 मि. सूर्योदय 7 क. 1 मि., सूर्यास्त 6 क. 42 मि.
आज जन्मलेली मुलं
आज जन्मलेली मुलं मीन राशीची असतील. बुध-मंगळ शुभयोगाचे सहकार्य घेऊन त्यांचा प्रयत्न हुशारीच्या समन्वयाने प्रवास सुरू राहील. शिक्षणातील पदवी, अर्थप्राप्ती, प्रतिष्ठेची वलये यांचा समावेश होईल. मुलाचे नाव द, च अद्याक्षर असतील.
दिनविशेष
जागतिक मराठी भाषा दिन
१९१२ - ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रख्यात साहित्यिक कवी, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्म.
१९३१ - थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे निधन
१९५२ - निर्मात प्रकाश झा यांचा जन्म
१९५६ - लोकसभेचे पहिले सभापती जी. व्ही. मावळणकर यांचे निधन
१९९७ - प्रसिद्ध गीतकार श्यामलाल बाबू राय ऊर्फ इंदीकर यांचे निधन
२०१० - समाजसेवक नानाजी देशमुख यांचे निधन