आज जन्मलेली मुलं
21 क. 31 मि. पर्यत वृश्चिक राशीत मुले असतील. त्यानंतर धनु राशीची मुले असतील. जिद्द आणि परिश्रम यातून मुले सरकत राहतील. त्यामध्ये व्यापार, शिक्षण, कला अशी केंद्रे असू शकतील. वृश्चिक राशी न, स, धनू राशी भ, ध अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019
भारतीय सौर, 09 कार्तिक 1941
मिती आश्विन शुद्ध चतुर्थी 25 क. 01 मि.
ज्येष्ठा नक्षत्र 21 क. 31 मि. वृश्चिक चंद्र
सूर्योदय 06 क. 39 मि., सूर्यास्त 06 क. 05 मि.
विनायकी चतुर्थी
दिनविशेष
1875- सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म.
1895- षट्कारांचे बादशहा सी. के. नायडू यांचा जन्म.
1920- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) ची स्थापना
1946- क्रिकेटपटू रामनाथ पारकरांचा जन्म.
1975- संगीतकार सचिन देव बर्मन यांचे निधन.
1984- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच सुरक्षारक्षकांकडून हत्या.
1986- बाल साहित्यिका आनंदबाई शिर्के यांचे निधन.
1999- चित्रकार डॅा. भय्यासाहेब ओंकार यांचे निधन.
2005- ज्ञानपीठ विजेती लेखिका अमृता प्रीतम यांचे निधन.
शुभाशुभ चौघडी
दिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी 6 प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराचा सूर्योदय- सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासून पुढे करावा.
दिवसा- सकाळी 6 ते 7.30 शुभ, 7.30 ते 9 रोग, 9 ते 10.30 उद्येग, 10.30 ते 12 चंचल, 12 ते 1.30 लाभ, 1.30 ते 3 अमृत, 3 ते 4.30 काल, 4.30 ते 6 शुभ. रात्री- 6 ते 7.30 अमृत, 7.30 ते 9 चंचल, 9 ते 10.30 रोग, 10.30 ते 12 काल, 12 ते 1.30 लाभ, 1.30 ते 3 उद्येग, 3 ते 4.30 शुभ, 4.30 ते 6 अमृत.