आजचे पंचांग
मंगळवार दि. 10 डिसेंबर 2019
भारतीय सौर 19, मार्गशीर्ष 1941
मिती मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी 10 क. 44 मि.
कृतिका नक्षत्र, अहोरात्र, मेष चंद्र 11 क. 18 मि.
सूर्योदय 7 क. 02 मि. सूर्यास्त 06 क. 01 मि.
आज जन्मलेली मुलं
11 क. 18 मि. पर्यंत मेष राशीत मुलांचा जन्म असेल. त्यानंतर वृषभ राशीची मुले असतील.निश्चय आणि आधुनिकता यातून मुले व्यवहार चक्र फिरवत ठेवतील.त्यात अधिक यश संपादन करता येईल.माता पित्यास शुभ.मेष राशी अ. ल. ई.तर वृषभ राशी ब,व, ऊ अद्याक्षर
- अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष
मानवी हक्क दिन
1870 - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचा जन्म.
1880 - प्राच्यविद्या पंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचा जन्म.
1892 - नाट्य अभिनेते आणि गायक व्यंकटेश बळवंत पेंढारकर यांचा जन्म.
1964 - लेखक, सूचिकार शंकर गणेश दाते यांचे निधन.
2001 - 'दादामुनी' अशोक कुमार यांचे निधन
2009 - लेखक, कवी, चित्रकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन.