आजचे पंचांग
भारतीय सौर 26, मार्गशीर्ष 1941
मिती मार्गशीष वद्य षष्ठी 25 क. 38 मि.
मघा नक्षत्र 25 क. 26 मि. सिह चंद्र
सूर्योदय 07 क. 06 मि., सूर्यास्त 06 क. 03 मि.
धनुर्मासारंभ
आज जन्मलेली मुलं
सिंह राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र- गुरु नवपंचम योगामुळे सफलता संपादन करु शकतील. चंद्र- हर्षल नवपंचम योगामुळे त्यात व्यापकता असेल. विज्ञान प्रांत असू शकतील. अचानक संर्घषातून मुले मोठी होत राहतील. सिंह राशी म, ट अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष
1901- कथाकार य. गो. जोशी यांचा जन्म. त्यांच्या शेवग्याच्या शेंगा कथा प्रसिद्ध आहेत.
1946- प्रसिद्ध अभिनेता सुरेश ओबेरॅाय यांचा जन्म.
1959- स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार डॅा. भोगराजू पट्टाभी सीताराम्मया यांचे निधन.
1972- अभिनेता जॅान अब्राहम यांचा जन्म.
1978- अभिनेता रिशेत देशमुख यांचा जन्म.
1985- प्रसिद्ध नाटककार, कथाकार मधुसुदन कालेलकर यांचे निधन.
2010- पुणे विद्यापीठाचे कुलगुरु, शिक्षकतज्ज्ञ देवदत्त अच्युत दाभोळकर यांचे निधन