आजचे पंचाग
मंगळवार, दि. 24 डिसेंबर 2019
भारतीय सौर 03 पौष 1941
मिती मार्गशीष वद्य त्रयोदशी 12 क. 19 मि.
अनुराधा नक्षत्र 16 क. 59 मि., वृश्चिक चंद्र
सूर्योदय 07 क. 9 मि., सूर्यास्त 06 क. 06 मि.
शिवरात्र
आज जन्मलेली मुलं
वृश्चिक राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना रवि- हर्षल नवपंचम योगाचे सहकार्य मिळणार असल्याने असाधारण गुणसंपन्नता त्यांच्यात असेल. त्यातून शिक्षण घेतील. पौसा मिळवतील. अनपेक्षित संधीतून त्यात आकर्षकता येऊ शकेल. वृश्चिक राशी न, य अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष
1899- नामवंत साहित्यिक, समाजसुधारक पांडुरंग सदाशिव तथा साने गुरुजी यांचा जन्म.
1924- हिंदी चित्रपटसृष्टीतील श्रेष्ठ पार्श्वगायक मोहमंद रफी यांचा जन्म.
1929- गजल अभ्यासक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचा जन्म.
1959- प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांचा जन्म.
1968- अपोलो- 8 यानातून अवकाशवीर चंद्राजवळ पोहोचले.
2000- नाटककार व कवी शं. गो. साठे यांचे निधन.
2005- दाक्षिणात्य अभिनेत्री, गीतकार, संगीतकार, गायिका भानुमती रामकृष्ण यांचे निधन.