आजचे पंचांग
मंगळवार दि. 31 मार्च 2020
भारतीय सौर 11 चैत्र 1942
मिती चैत्र शुद्ध सप्तमी, 27 क. 50 मि.
मृग नक्षत्र 18 क. 44 मि.
मिथुन चंद्र
सूर्योदय 06 क. 35 मि., सूर्यास्त 06 क. 51 मि.
आज जन्मलेली मुलेमिथुन राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना मंगल-शनी सहयोगामुळे समस्यांशी सामना करीत सफलता संपादन करावी लागेल. राशीस्थानाच्या राहुचा आधार अधूनमधून मिळत राहील, त्याचा उपयोग करा. शिक्षण, व्यवहार सोपे करता येतील. मिथुन राशी क. छ, घ, अद्याक्षर- अरविंद पंचाक्षरी
आजचे दिनविशेष
1843 - पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म
1865 - भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म
1871 - स्वातंत्र्यसेनानी कर्नाटकसिंह गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म
1926 - इतिहास संशोधक व संग्राहक दत्तात्रय बळवंत पारसनीस यांचे निधन
1927 - श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय न्यानकोष हा महाप्रचंड न्यानकोष प्रकल्प पूर्ण केला
1972 - अभिनेत्री मीनाकुमारी यांचे निधन
1982 - भारतीय पहिल्या जग्वार विमानाने आकाशात झेप घेतली