आजचे पंचांग
बुधवार दि. 1 एप्रिल 2020
भारतीय सौर 12 चैत्र 1942
मिती चैत्र शुद्ध अष्टमी, 27 क. 41 मि.
आर्द्रा नक्षत्र 19 क. 29 मि.
मिथुन चंद्र
सूर्योदय 06 क. 34 मि., सूर्यास्त 06 क. 53 मि.
आज जन्मलेली मुलेमिथुन राशीत राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र-नेपच्युन नवपंचम योगामुळे प्रयत्न आणि कार्य यांच्या समन्वयातून सफलता संपादन करून आगेकूच सुरू ठेवतील. शिक्षण ते प्राप्ती त्याची केंद्र राहतील. माता पित्यास शुभ. मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे दिनविशेष
1889 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि पाहिले सरसंघचालक केशव बळीराम हेगडेवार यांचा जन्म1928 - पुणे वेधशाळेच्या कामास प्रारंभ, देशातील हवामानाचा पहिला अहवाल वेधशाळेने प्रसिद्ध केला1935 - भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना1941 - क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचा जन्म1955 - ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके या गीतकार आणि संगीतकार द्वयीने अजरामर केलेले गीतरामायणाचे आकाशवाणीवरून प्रथम प्रसारण झाले.1989 - समाजवादी नेते श्रीधर माधव उर्फ एस. एम. जोशींचे निधन