कन्या राशीत जन्मलेल्या आजच्या चंद्र- शुक्र प्रतियोगातील मुलांना विचार ते कार्यप्रांत यामध्ये संयमाने सफलता संपादन करावी लागेल. परिचित आणि प्रलोभन या संबंधातील सावधानता सफलता निर्दोष करण्यास उपयुक्त ठरेल. कन्या राशी प,ठ आद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020
भारतीय सौर 23 माघ 1941
मिती माघ वद्य चतुर्थी 23 क. 40 मि.
उत्तर नक्षत्र, 11 क. 46 मि., कन्या चंद्र
संकष्टी चतुर्थी चंद्रोदय 21 क. 53 मि.
सूर्योदय 7 क. 10 मि., सूर्यास्त 6 क. 36 मि.
दिनविशेष
1742- पेशवाईतील नामवंत मुत्सद्दी नाना फडणवीस यांचा जन्म.
1824- समाजसुधारक, आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म.
1920- हिंदी चित्रपटसृष्टीतील चरित्र अभिनेते प्राण यांचा जन्म.
1928- वल्लभभाई पटेल यांचा बारडोलीचा सत्याग्रह सुरु.
1949- क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ यांचा जन्म.
1998- कवयित्री पद्मा गोळे यांचे निधन.
2001- नाट्यसंमेलनाच्या माजी अध्यक्ष, अभिनेत्री भक्ती बर्वे- इनामदार यांचे निधन.