धनु राशीत जन्मलेल्या मुलांचा पर्वकाळ 19 क. 25 मि. पर्यंत राहील. त्यापुढे मकर राशीच्या मुलांचा प्रांत असेल. ग्रहांच्या शुभ संपर्कामुळे सात्त्विकता आणि कल्पकता यातून सफलता संपादन करून कार्यप्रांतात जम बसवतील. शिक्षण ते व्यवहारात त्याची केंद्र असतील. धनु राशी भ, ध मकर राशी ज, ख अद्याक्षर- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग बुधवार दि. 18 मार्च 2020भारतीय सौर 28 फाल्गुन 1941मित्ती फाल्गुन वद्य दशमी 28 क. 27 मि.पूर्वाषाढा नक्षत्र 13 क. 01 मि., धनु चंद्र 19 क. 25 मि.सूर्योदय 06 क. 45 मि., सूर्यास्त 06 क. 48 मि.
दिनविशेष1881 पत्रकार, नाटककार वीर वामनराव जोशी यांचा अमरावती येथे जन्म1894 भारताचे राष्ट्रीय नेते रफी अहमद किडवई यांचा जन्म1905 प्रसिद्ध लेखिका मालती विश्राम बेडेकर यांचा जन्म1922 महात्मा गांधी यांना असहकार आंदोलनाबद्दल सहा वर्षे तुरुंगवास 1938 निर्माता व अभिनेता शशी कपूर यांचा जन्म1948 क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचा जन्म1965 पार्श्वगायिका अलिशा चिनाय हिचा जन्म2001 चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे निधन