वृश्चिक चंद्र राशीत जन्मलेली आजची मुले बुध-नेपच्यून नवपंचम योगाचे सहकार्य घेऊन प्रवास सुरु ठेवतील. विज्ञान, संशोधन अशा कार्याशी संबंध येणे शक्य आहे. गुरु नेपच्यून केंद्रयोगामुळे मात्र सतत सावध असावे लागते. जन्मनाव न, य (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
रविवार दि. 16 जून 2019
- भारतीय सौर 26 ज्येष्ठ 1941
- मिती ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशी 14 क. 2 मि
- अनुराधा नक्षत्र 10 क. 7 मि. वृश्चिक चंद्र
- सूर्योदय 06 क. 2 मि., सूर्यास्त 07 क. 16 मि
- वटपोर्णिमा
दिनविशेष
1914 - सहा वर्षाच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका
1920 - प्रसिद्ध गायक, संगीतकार, निर्माता हेमंत कुमार यांचा जन्म
1925 - स्वातंत्र्य चळवळीतील बंगाली नेते देशबंधू चित्तरंजन दास यांचे निधन
1944 - भारताचे प्रख्यात रसायन शास्त्रज्ञ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचे निधन
1950 - अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म
1977 - गायक, अभिनेते श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचे निधन
1994 - अभिनेत्री आर्या आंबेकर हिचा जन्म
1995 - दीनानाथ मंगेशकर यांच्या पत्नी शुद्धमती ऊर्फ माई मंगेशकर यांचे निधन