वृषभ राशीत जन्मलेली आजची मुले रवी चंद्र शुभयोगामुळे महत्वाच्या प्रांतात आपला ठसा उमटवतील. विद्या, विहार, विकास त्यांची केंद्र राहतील. कला, संगीताशी संपर्क शक्य आहे. माता, पित्यास शुभ.
वृषभ राशी ब, व, ऊ अद्याक्षर
(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
रविवार दि. 29 मार्च २०२०
भारतीय सौर 09 चैत्र 1942
मिती चैत्र शुद्ध पंचमी 26 क. 18 मि.
कृतिका नक्षत्र 15 क. 18 मि., वृषभ चंद्र
सूर्योदय 06 क. 36 मि., सूर्यास्त 06 क. 51 मि.
आजचे दिनविशेष
1853 - स्टेरिओस्कोपीक एक्स रे फोटोग्राफीचे जनक, थोर शास्त्रज्ञ इल्ह्यू थॉमसन यांचा जन्म.
1857 - ब्रिटिश बंगाल पलटणीतील बराकपूर छावणीतील भारतीय शिपाई मंगल पांडे यांनी अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.
1869 - राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली शहराचा आराखडा तयार करणाऱ्या सर एडविन ल्युटन्स या अर्किटेक्टचा जन्म.
1926 - विनोदी कथाकार, कादंबरीकार, अनुवादक, प्रवासवर्णनकार बाळ गाडगीळ यांचा जन्म.
1929 - अभिनेता उत्पल दत्त यांचा जन्म.
1948 - 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ लालूजीराव कोतापल्ले यांचा जन्म.