आज जन्मलेली मुलं - ०७ क. ४० मि. पर्यंत मुले धनु राशीत असतील. त्यानंतर मुलांचा प्रवेश मकर राशीत होईल. सरळ विचार आणि व्यवहारी कृती मुलांचा ध्येयमार्ग राहील. शिकस्तीच्या प्रयत्नाने यश संपादन करावे लागेल. पुढे यश मिळत राहते. धनु राशी भ, ध, मकर राशी ज, ख अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांगशुक्रवार दि. २४ जानेवारी २०२०भारतीय सौर ०४ माद्य १९४१ मिती पौष वद्य अमावास्या २७ क. १२ मि. उत्तराषाढा नक्षत्र २६ क. ४६ मि., धनु चंद्र ०७ क. ४० मि. सूर्योदय ०७ क. १६ मि., सूर्यास्त ०६ क. २६ मि. दर्श अमावास्या
आजचे दिनविशेष१९२३ - अभिनेत्री रत्ना साळगावकर उर्फ हंसा वाडकर यांचा जन्म१९२४ - तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पु रेगे यांचा जन्म१९४५ - प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक सुभाष घई यांचा जन्म१९६६ - आल्प्स पर्वतात बोईंग ७०७ च्या अपघातात शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांचे निधन२००२ - कोऊर येथून एरियन-४ या अग्निबाणाने भारताचा उपग्रह इन्सॅट ३ सीचे यशस्वी प्रक्षेपण केले२०११ - शास्त्रीय गायक स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे निधन