आज जन्मलेली मुलंवृषभ राशीची मुले ११ क. ०२ मि. पर्यंतची असतील. त्यानंतर मिथुन राशीतील मुलांचा प्रारंभ होईल. अभिनव कार्यपद्धती आणि कल्पनांनी केलेले व्यवहार यातून सफलता संपादन करणारी मुलं आहेत. प्रयत्नाने त्यात व्यापकता आणता येईल. वृषभ राशी ब, व, ऊ मिथुन राशी क, छ, घ आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
- शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर २०१९
- भारतीय सौर २४ कार्तिक १९४१
- मिती कार्तिक वद्य तृतीया १९ क. ४६ मि.
- मृग नक्षत्र २३ क. १२ मि., वृषभ चंद्र ११ क. ०२ मि.
- सूर्योदय ०६ क. ४६ मि., सूर्यास्त ०५ क. ५९ मि.
- संकष्टी चतुर्थी
आजचे दिनविशेष
- १९२९ - हायकू हा प्रकार लोकप्रिय करणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांचा जन्म
- १९४७ - हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री विद्या सिन्हा यांचा जन्म
- १९४८ - लोकप्रिय मराठी रहस्यकथा आणि सामाजिक कांदबऱ्यांचे लेखक सुहास शिरवळकर यांचा जन्म
- १९८२ - प्रसिद्ध गांधीवादी नेते विनायक नरहरी भावे तथा आचार्य विनोबा भावे यांचे निधन
- १९८६ - टेनिसपटू सानिया मिर्झाचा जन्म
- १९८९ - सचिन तेंडुलकरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण