आज जन्मलेली मुलं - मेष राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-हर्षल युतीमुळे बौद्धिक क्षेत्रात प्रभाव निर्माण करु शकतात. परंतु विचारांमध्ये लहरीपणा असतो. त्यामुळे सफलतेमधील आनंद सहज मिळत नाही. गुरु शुभ आहे. प्रगती होत राहील. मेष राशी अ, ल, ई आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
- सोमवार, दि. ११ नोव्हेंबर २०१९
- भारतीय सौर २० कार्तिक १९४१
- मिती कार्तिक शुद्ध चतुर्दशी १८ क. ०२ मि.
- अश्विनी नक्षत्र १९ क. १७ मि., मेष चंद्र
- सूर्योदय ०६ क. ४५ मि., सूर्यास्त ०६ क. ०० मि.
- वैकुंठ चतुर्दशी
आजचे दिनविशेष
- १८६८ - श्रीधर बाळकृष्ण कुलकर्णी शाहीर पठ्ठे बापूराव यांचा जन्म
- १८७२ - किराणा घराण्याचे गायक अब्दुल करीम खॉँसाहेब यांचा जन्म
- १९२४ - भारतीय क्रिकेट खेळाडू रुसी मोदी यांचा जन्म
- १९३६ - अभिनेत्री माला सिन्हा यांचा जन्म
- १९४७ - पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले झाले
- १९९७ - चित्रपट अभिनेते यशवंत दत्त यांचे निधन, भारतीय कामगार संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचा १० नोव्हेंबर हा जन्मदिवस आहे. रविवार दि. १० च्या परिपाठामध्ये अनावधानाने त्यांच्या निधनाचा उल्लेख झाला आहे. त्याबद्दल दिलगीर आहोत