आजचे पंचांग
सोमवार 7 ऑक्टोबर 2019
भारतीय सौर, 15 अश्विन 1941
मिती अश्विन शुद्ध नवमी, 12 क, 38 मि.
उत्तराषाढा नक्षत्र 17. 25 मि. मकर चंद्र
सूर्योदय 06 क. 32 मि. सूर्यास्त 06 क. 20 मि.
महानवमी नवरात्र स्थापन व पारणा
दिनविशेष
1708 - शीख धर्मगुरू गुरु गोविंद सिंह यांचे महानिर्वाण .
1907 - गुजराती नाटककार, लेखक प्रागजी डोसा यांचा जन्म.
1914 - गझलसम्राज्ञी बेगम अख्तर यांचा जन्म.
1919 - महात्मा गांधी यांच्या नवजीवन पत्राची सुरुवात
1927 - प्रसिद्ध कथालेखिका, कादंबरीकार, आत्मचरित्रकार, प्रवासवर्णनकार मृणालिनी प्रभाकर देसाई यांचा जन्म
1978 - भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याचा जन्म
2002 - भारतीय अॅथलिट अंजू बॉबी हिने बुसान आशियाई क्रीडा स्पर्धेत लांब उडीमध्ये सुवर्णपदक पटकावले
आज जन्मलेली मुले
मकर राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना रवि-शनी केंद्रयोगामुळे कष्टाने यश मिळवावे लागेल. त्यात बौद्धिक आणि व्यावहारिक वर्तुळं असतील. चंद्र-मंगळ नवपंचम योग यश मिळवून देण्यात अधिकाधिक सहकार्य करील.
मकर राशी - ख, ज अद्याक्षर