आज जन्मलेली मुलं – ०७ क. १६ मि. मीन राशीत जन्मलेली मुले असतील. त्यापुढे मेष राशीत मुले प्रवेश करतील. सात्त्विकता आणि निर्धार यांच्या संपन्नतेमुळे कार्यसफलता संपन्नता निर्माण करते. पदवी मिळवता येते. प्राप्ती प्रभावी करता येईल. मीन राशी द, च, मेष राशी अ, ल, ई अद्याक्षर(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
गुरुवार दि. २६ मार्च २०२०
भारतीय सौर ०६ चैत्र १९४२
मिती चैत्र शुद्ध द्वितीया १९ क. ५४ मि.
रेवती नक्षत्र ०७ क. १६ मि.,मीन चंद्र क. ०७ क १६ मि.
सूर्योदय ०६ क. ३९ मि., सूर्यास्त ०६ क. ५० मि.
आजचे दिनविशेष
१९३८ – ज्येष्ठ आसामी साहित्यिक लक्ष्मीनाथ बेझबरुआ यांचे निधन
१९३९ – ज्येष्ठ समीक्षक पुष्पा भावे यांचा जन्म
१९७२ – पहिली आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषद संपन्न
१९९६ – भारतीय चित्रकार के. के हेब्बर यांचे निधन
१९९९ – जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध संगीतकार आनंद शंकर यांचे निधन
२००८ – प्रसिद्ध साहित्यिक बाबूराव बागुल यांचे निधन
२०१२ – सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे निधन, त्यांचे संपूर्ण नाव माणिक सीताराम गोडघोटे होते.