आज जन्मलेली मुलंकुंभ राशीतील मुलं २९ क. २९ मि. पर्यंतची राहतील. त्यानंतर मीन राशीतील मुलं जन्म घेतील. प्रारंभीची मुलं विज्ञानाच्या सहवासात राहतील. नंतरची मुलं प्रथा, परंपरा, सांभाळतील आणि गुरुकृपेने कार्यप्रांतात यश संपादन करतील. कुंभ राशी ग, स, मीन राशी द, च अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचे पंचांग
- गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर २०१९
- भारतीय सौर १६ कार्तिक १९४१
- मिती कार्तिक शुद्ध दशमी ०९ क. ५५ मि.
- शततारका नक्षत्र ०९ क. १५ मि.
- कुंभ चंद्र २९ क. ३९ मि.
- सूर्योदय ०६ क. ४२ मि., सूर्यास्त ०६ क. ०२ मि.
आजचे दिनविशेष
- १८५८ - बिपीनचंद्र पाल यांचा जन्म
- १८८४ - क्रांतिकारक पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म
- १८८८ - नोबेलप्राप्त, भारतरत्न चंद्रशेखर व्यंकटरामन् यांचा जन्म
- १९०५ - आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक केशवसुत यांचे निधन
- १९५४ - अभिनेते कमल हसन यांचा जन्म
- १९६३ - साहित्यिक य. गो. जोशी यांचे निधन
- १९९८ - प्रख्यात, गायक, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे निधन
- २००६ - पॉली उमरीगर यांचे निधन
- २००९ - लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचे निधन