- वामनराव देशपांडेदेहाभिमानिनि सर्वे दोघा: प्रादुर्भवन्तिमर्त्य शरीराशी आणि भोवतीच्या जड मर्त्य सृष्टीशी जिवाचा नित्य संबंध जोडला गेल्यामुळे शरीर जाणिवेने आयुष्य जगण्याची माणसाला सवय जडल्यामुळे जड पदार्थांचा, नित्याचे आयुष्य जगताना आश्रय घेतल्यामुळे मानवी मर्त्य आयुष्यात तºहेतºहेचे दोष निर्माण होतात. तेच असह्य दु:खाचे मूळ कारण आहे. म्हणून साधकांनी देहाभिमाने एक क्षणसुद्धा जगू नये. परमात्मतत्त्व जाणून घेत, परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी आध्यात्मसाधना आहे, याचे भान येणे आवश्यक आहे. इष्ट वा अनिष्ट गोष्टींचा परिणाम चित्तावर होणार नाही, याची काळजी साधकाने प्राणपणाने घेतली, तरच परमात्मतत्त्व जाणून घेणे काहीसे सोपे जाईल. त्यासाठी साधकाने नेमके काय करावे, यावर भाष्य करताना भगवंत म्हणतात,मयि चानन्ययोगेन भक्तीरव्यभिचारिणी।विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि।।‘पार्था, या संसारसागरात देहबुद्धीने जगणारे असंख्य जीव अक्षरश: बुडून मरतात आणि पुन्हा नव्या योनीत जन्म घेतात. या जन्म-मृत्यूच्या गरागरा फिरणाऱ्या चक्रावर ते अनंतकाळ फिरत राहतात, परंतु जे मजसी अनन्य होऊन केवळ माझीच भक्ती करतात, माझ्या व्यतिरिक्त त्या माझ्या भक्तांना कुणाकडूनही काहीही मिळविण्याची इच्छासुद्धा नसते. ज्यांना मानवी मतमतांतरांचा गोंधळ ऐकवत नसल्यामुळे ज्यांना एकांत प्रिय वाटतो, किंबहुना ज्यांना एकांतात बसून माझी उपासना करावी असे वाटते, तो त्या भक्तांचा मूळ स्वभावच असतो. ज्यांना जनसमुदायात रमणे अजिबात प्रिय नसते, किंबहुना तत्त्वज्ञानभरल्या आध्यात्म विचारातच रममाण व्हायला अधिक आनंद वाटतो, तत्त्वज्ञानाच्या साहाय्याने अक्षरब्रह्माची ज्यांनी प्राप्ती करून घ्यावीशी वाटते, तेचखरे ज्ञानी भक्त असतात. बाकी सर्व अज्ञानच आहे रे, पार्था...’
खरे ज्ञानी भक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 4:55 AM