शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

विद्वानांचे साहित्य आत्मसात केल्यास होईल पुण्यवान समाजाची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 5:00 AM

तो स्वर्गलोकांच्या पर्वतावर तो तराजू घेऊन बसला होता.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेमला एका तीर्थक्षेत्री गमतीशीर शिल्प दिसले. ते शिल्प म्हणे चित्रगुप्ताचे होते. त्याच्या हातात एक तराजू होता व तो स्वर्गलोकांच्या पर्वतावर तो तराजू घेऊन बसला होता. पर्वताला बरोबर मध्यभागी एक घळ होती. न राहवून मी एका आजोबांना विचारलेच, ‘आजोबा, या शिल्पातून नेमका काय बोध घ्यायचा?’ आजोबा म्हणाले, ‘अरे वेड्या बोध नाही घ्यायचा; खिशातून एक रुपयाचे नाणे काढायचे व तराजूकडे फेकायचे. उजव्या तराजूत नाणे पडले की आपण पुण्यवान आणि डाव्या तराजूत पडले की पापी.’ आजोबा एकीकडे हे पाप-पुण्य पुराण भरभरून सांगत होते आणि मी एक-एक रुपया फेकणाऱ्या भोळ्या भाविकांचे निरीक्षण करत होतो. बहुतेकांचा रुपया स्वर्गलोकांच्या पर्वताच्या घळीत अर्थात मध्यभागी पडत होता आणि पाच-दहा सेकंदात नष्ट होत होता. म्हणून आजोबांना मध्येच थांबवून न राहवून मी म्हणालो, ‘रुपया जर दोन्ही तराजूंच्या मध्यभागी पडला तर? तर आजोबा पटकन उद्गारले, ‘फिफ्टी-फिफ्टी : पाप-पुण्य फिफ्टी-फिफ्टी’. मग मला उलगडा होत गेला की, आम्ही नेमके ‘फिफ्टी-फिफ्टी’मध्ये अडकलो आहोत. जेव्हा पापाचे अपचन होते तेव्हा पुण्याईची ‘टॅबलेट’ घेण्यासाठी असंख्य मंडळी देव-धर्माच्या नावाने उदो-उदो करतात व पुण्याईच्या राशीच्या पाठीमागे लागतात. खरे तरपुण्य परोपकार पाप ते परपिडा ।आणिक नाही जोडा दुजा यासी ॥सत्य तोचि धर्म-असत्य ते कर्म ।आणिक हे वर्म नाही दुजे ॥तुका म्हणे, उघडे आहे हित यात ।जया जे उचित करा तैसे ॥या तुकोबांच्या वचनांप्रमाणे दुसऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू बघून आपले डोळे चटकन डबडबले की आपण पुण्यवान आहोत, असे समजायला काहीच हरकत नाही. दुसºयाला सुखी पाहून ज्याला इहलोकात आणि परलोकांतसुद्धा सुखाची अनुभूती येते तोच खरा पुण्यवान होय. ‘तुका म्हणे, सुखे पराविया सुखे, अमृत हे मुखे स्त्रवतसे’ या वचनाप्रमाणे ज्याचे हात आशीर्वादासाठी उंचावतात व पाय अभेदरूप देवत्वाच्या गावाला जातात तो खरा पुण्यवान.

जो स्वप्नातसुद्धा दुसºयाचे अहित चिंंतित नाही. जगात ज्यांचे कुणीच नाही त्यांना हृदयासी कवटाळून आपल्या आंतरिक सौजन्याने उजळून टाकण्याचे काम करतो, तोच खरा पुण्यवान, सत्पुरुष. अशा भाग्यवंतांना टिळे, टोप्या, माळा, रूद्रांक्षाच्या भूषणांची गरज वाटत नाही तर दीन, दु:खी व जीवनेच्छा हरविलेल्या माणसांच्या जीवनात जो जगण्याची आशा निर्माण करतो. भूतदया, पशुदया, परोपकार ही ज्याच्या जीवनाची त्रिसूत्री आहे अशा सज्जनास कुठल्याच धर्म, सांप्रदायाचे लेबल लागत नाही तर आपल्या सर्वस्वाचा त्याग करून जो दुसºयाच्या जगण्यात आपला देव पाहतो, अशा पुण्यवान व परोपकारी सज्जनाची तुलना रहिमने वाटणाºयांच्या हातालासुद्धा आपला रंग देणाºया मेहंदीबरोबर करताना म्हटले आहे -वोें रहिम नर धन्य है, परउपकारी अंगबाटनवारें को लगे जोें मेहंदी के रंग ॥सर्व समाजाने निरामय जगण्यातला आनंद उपभोगावा म्हणून खरा पुण्यवान, सज्जन वाटायचे झाले तर ज्ञान, भ्रती, कर्म व आनंद वाटण्याचे काम करतो तेव्हा कुठल्या तरी देवाच्या नावाने शतकोटी नामजप करण्यापेक्षा जो समाजात सज्जनांची संख्या वाढविण्यासाठी दिव्यासारखा स्वत: जळत राहतो व इतरांना प्रकाशित करतो अशा बुद्ध, महावीर, बसवेश्वर, कबीर, ज्ञानेश्वर यांची नावे घ्यावीत व त्यांचे साहित्य आत्मसात करावे तरच सुसंस्कारी व खºया अर्थाने पुण्यवान समाजाची निर्मिती होईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक